वर्ष २०१६ रोजी श्री अविनाश गायकवाड आणि श्रीमती कविता अविनाश गायकवाड या उभयताांनी दत्तराज फार्म हाऊस संपादित केले. त्यावेळची आजूबाजूची ओसाड रानमाळाची जागा उभयताांनी स्वकष्टाने सुंदर वनराईने फुलवून टाकली. त्याच बरोबर श्री अविनाश गायकवाड आणि श्रीमती कविता अविनाश गायकवाड हे सात्विक दाम्पत्य सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या दाम्पत्याने पूर्ण केलेले संकल्प पाहता नतमस्तक व्हावेसे वाटेल
ओंकारेश्वर मंदिराचीस्थापना :- श्री अविनाश गायकवाड आणि श्रीमती कविता अविनाश गायकवाड या उभयताांनी ओांकारेश्वर मंदिराच्या स्थापनेचा सात्विक संकल्प वर्ष २०२३ रोजी पूर्ण केला. गेली तीन वर्षे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा होत आहे. त्याच बरोबर अन्नदान व वस्त्र दान हे संकल्प आई वडिलांच्या शुभ हस्तेपार पडत आहेत.
गावातील मंदिरांच्या जीर्णोद्धारात खारीचा वाटा :- उभयताांवर असलेल्या आई वडिलांच्या संस्काराचे प्रतीक म्हणून गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारात खारीचा वाटा नेहमीच उचलला जातो.
वनभोजन :- पंचक्रोशीतल्या गावातील आदिवासी शाळकरी मुलाांसाठी वनभोजनाचा उपक्रम दरवर्षी ठेवला जातो. यात या मुलाांना ला दि दा स्पोर्ट्स क्रीडानगरी मध्ये सहलीसाठी आणले जाते. त्यांच्या पूर्णादिवसाच्या जेवणाची व मनोरंजनाची जबाबदारी उभय कुटुंब आनंदाने पार पाडते.
शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरची व्यवस्था पाणी म्हणजे जीवन. शाळेतील मुलाांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलबध्द झाल्यास मलाांचे आरोग्य चाांगले राहील या विचाराने प्रेरित होऊन ग्रुप ग्रामपांचायतीतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळाांमध्ये पिण्याच्या पिण्याचे फिल्टर बसविण्याचे महत्वाचे कार्य उभयताांनी वर्ष २०२३ रोजी पूर्ण केले
मुलांच्या कलागुर्णांना वाव मिळावा अशा स्पर्धांचे आयोजन ला दी दा स्पोर्ट्स क्रीडानगरी तर्फे मुलांसाठी चित्रकला, गायन, नृत्य, वक्तृत्व अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा प्रोत्साहनात्मक स्पर्धांमुळे मुलांमधील गुणांची जाण पालकाांना व शिक्षकांना होते व त्या दृष्टीने अशा मुलांच्या गुणांची जोपासना करता येऊ शकते.
गावातील युवकांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन खेळ हा सर्व मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. युवकांनी यावर विशेष मेहनत घ्यावी म्हणून गावातील युवकांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या सर्व युवक स्पर्धकांना टी शर्ट प्रोत्साहनात्मक बक्षिसांचे वाटप केले जाते.
गावातील युवकांसाठी रोजगार :- गावातील युवक शिकून रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. पण या मातीची बांधीलकी जपावी म्हणून या दाम्पत्याने गावातील युवकांसाठी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच ला दि दा स्पोर्ट्स क्रीडानगरी ही संकल्पना उभी राहिली व गावातील मुलांसाठी गावातील युवकांनी आरोग्य व रोजगार यांचा मेळ साधत हा नवीन उपक्रम सुरु केला आहे.
ला दि दा स्पोर्ट्स क्रीडानगरी ः- उभय दाम्पत्याने सुरु केलेले ला दि दा स्पोर्ट्स क्रीडानगरी आता जवळपासच्या पंचक्रोशीतल्या गावातील लहान मुलांसाठी आणी तरुण वर्गासाठी आरोग्यदायी आणि शैक्षणीक उपक्रम सुरु करीत आहे. त्यात स्विमिंग, बॅडमिंटन, टेबलटेनिस, कॅरम, सिंगिंग, डान्सिंग अशा प्रोत्साहनात्मक व आरोग्यदायी उपक्रमांचा सहभाग आहे.
या उपक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार , विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास , गावातील युवकांना रोजगार, शाळांचा व ग्रुप ग्रामपंचायतीचा उस्फुर्त सहभागाचा मानस संकल्प आहे.